विशाळगड, शिवडी यांसह अन्य गडांवरील अतिक्रमण हटवण्याचे काम हे हिंदुत्वनिष्ठ शासन करेल ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवल्याने भाजपकडून मुंबईत जल्लोष

आमदार नितेश राणे, भाजपा

मुंबई – अफझलखानाच्या कबरीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी सर्व शिवप्रेमी करत होते. अफझलखानावर प्रेम करणार्‍या यापूर्वीच्या शासनकर्त्यांमुळे हे काम झाले नव्हते. ते काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले, याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात विशाळगड, शिवडी यांसह अन्य गडांवरील अतिक्रमण हटवण्याचे काम हे विद्यमान हिंदुत्वनिष्ठ शासन करेल, असा विश्वास भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला.

अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडल्यानिमित्त ११ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या वेळी आमदार नीतेश राणे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना वरील विश्वास व्यक्त केला.