मुंबई गोवा महामार्गावरील भीषण अपघातामध्ये ९ जण जागीच ठार

मुंबई-गोवा हायवेवर कार-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई – मुंबई गोवा महामार्गावर १९ जानेवारी या दिवशी पहाटे ५ वाजता रेपुरी येथे ट्रक आणि मोटार कार यांचा भीषण अपघात झाला .या अपघातामध्ये गाडीतील ९ जण जागीच ठार झाले, अशी माहिती गोरेगाव येथील पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

 (सौजन्य : ABP MAJHA)

अपघात झाल्यावर गोरेगाव येथील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले. अपघातामध्ये १० जण गंभीर घायाळ झाले आहेत. घायाळ व्यक्तींना रायगडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले आहे. यामध्ये चार वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. मागील काही वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाचे प्रलंबित काम आणि वाढते अपघात यांमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.