एस्.टी. महामंडळाचा परिपत्रकाद्वारे आदेश !
मुंबई – एस्.टी. महामंडळाच्या बसगाड्यांच्या काचांवर देवतांची चित्रे किंवा स्टीकर लावण्यात येतात; मात्र यामुळे रस्त्यावरील वाहने दिसण्यास अडथळा निर्माण होऊन अपघात होऊ शकतात. त्यामुळे एस्.टी. महामंडळाने परिपत्रक काढत अशा प्रकारे काचांवर कोणत्याही प्रकारची छायाचित्रे किंवा स्टीकर चिकटवू नयेत, असे आदेश काढले आहेत. महामंडळाच्या नागपूर विभागाने परिपत्रकाद्वारे ‘एस्.टी.च्या काचा स्वच्छ असाव्यात’, असे म्हटले आहे. एस्.टी.वर काळूआई, बाळूमामा, जय मल्हार, करवीरनिवासिनी, विठुमाऊली किंवा अन्य कोणत्याही देवतांची चित्रे न लावण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाबसगाड्यांच्या काचांवर देवतांची चित्रे न लावण्याचा आदेश म्हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |