मुंबईत मार्चच्‍या शेवटी ‘जी-२०’ शिखर परिषद !

मुंबईत ‘जी-२०’ शिखर परिषदेच्‍या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्चच्‍या शेवटी होणार आहे. बैठकीच्‍या पूर्वसिद्धतेसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

मुंबईत मार्चच्‍या शेवटी ‘जी-२०’ शिखर परिषद !

मुंबईत ‘जी-२०’ शिखर परिषदेच्‍या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्चच्‍या शेवटी होणार आहे. बैठकीच्‍या पूर्वसिद्धतेसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

आजपासून राज्‍यातील १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर !

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्‍यातील १८ लाख सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे सरकारी रुग्‍णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्‍प होणार आहेत.

गड-दुर्गांवर मद्यपान केल्यास ३ मासांची शिक्षा !

या संदर्भात विधी आणि न्याय विभागाला संमतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्यातील गड-दुर्गांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याविषयीची लक्षवेधी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मांडली होती.

समृद्धी महामार्गावर ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ चालू करणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘समृद्धी महामार्गावर लवकरच ‘वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ चालू करणार आहे’, अशी घोषणा केली. यासह ‘महामार्गावर जिथे प्रवेश होतो, तेथेच वाहनातील प्रवाशांची पडताळणी केली जाईल.

यापुढे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

वीजदेयक भरले नाही, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, यासाठी राज्यशासन ‘महावितरण’समवेत करार करण्याच्या सिद्धतेत आहे. यापुढे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे आश्वासन १३ मार्च या दिवशी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे विधानमंडळाच्या कार्यालयाकडून परिपत्रक !

अशा हास्यास्पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्यकारभार कसा करत असेल, याची कल्पना येते !

‘एच्.३ एन्.२’ तापाने महाराष्ट्र बाधित न होण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करावी ! – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच्.३ एन्.२’ तापाच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच्.३ एन्.२’ तापाचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडीतील आमदारांचे आंदोलन !

शेतकर्‍यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी १३ मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.

अंधेरी (मुंबई) येथे पोलंडहून आलेल्या महिलेवर बलात्कार !

अंधेरी येथे पोलंडहून आलेल्या एका महिलेवर बलात्कार झाला असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘एशियन बिझनेस एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्स लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोपी मनीष गांधी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.