अंधेरी (मुंबई) येथे पोलंडहून आलेल्या महिलेवर बलात्कार !

अंधेरी येथे पोलंडहून आलेल्या एका महिलेवर बलात्कार झाला असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘एशियन बिझनेस एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्स लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोपी मनीष गांधी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

परराज्यातील आंब्यांची ‘हापूस आंब्या’च्या नावे विक्री केल्यास कारवाई होणार ! – बाजार समिती

बाजार समिती आणि अन्न अन् औषध प्रशासन यांच्या अधिकार्‍यांनी वारंवार कारवाई केल्याने याला काही प्रमाणात आळा बसला आहे. असे असले, तरी अद्यापही काही प्रमाणात फसवणुकीचे प्रकार चालूच आहेत.

जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जैन समाज हा दुसर्‍यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. जैन समाजाने संकटप्रसंगी देशाला भरभरून साहाय्य केले आहे. समाजाप्रती त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना ठाऊक आहे, असे गौरवोद्गाार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.

महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! – प्रा. वृषाली मगदूम

देशभरात महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने महिलांची स्थिती सुधारत आहे कि बिघडली आहे ? हे लक्षात येते, असे मत ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या विश्वस्त प्रा. वृषाली मगदूम यांनी वाशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

(म्हणे) ‘आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती घटनाबाह्य !’ – आमदार रईस शेख

आमदार रईस शेख यांचा उच्च न्यायालयातील याचिकेत दावा !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

घाईघाईने निर्णय नाही, तरतुदी कराव्या लागतील ! – उपमुख्यमंत्री

जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही. या योजनेसाठी सर्वांशी चर्चा करू. जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी तरतुदी कराव्या लागतील. फक्त निवडणुकीपुरता विचार करून चालणार नाही.

पाथरी (जिल्हा परभणी) येथील कर्मचार्‍यावरील गुन्हा नोंद प्रकरणाची पुन्हा पडताळणी करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

पाथरी येथील नवीन आठवडा बाजारात बसण्यासाठी प्रतिमास ५ सहस्र रुपये खंडणी न दिल्यास भाजीपाला विकता येणार नाही, असे सांगून जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्यामुळे नगरपालिकेच्या कर्मचार्‍याविरुद्ध खंडणी वसूल केल्याविषयी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे.

राज्यातील पोलीस पाटील यांचे मानधन वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील गावपातळीवर कार्यरत पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाच्या अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर आणखी किती वर्षे नियंत्रण ठेवायचे ?

या वेळी महामार्गाची दुरवस्था, तसेच रखडलेले चौपदरीकरण यांविषयीही न्यायालयाने तीव्र खेद व्यक्त केला. राज्य सरकारने प्रविष्ट केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात विसंगती असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला. त्याची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली.

‘जोतिबा देवस्थान’ या न्यासाच्या भूमीची विक्री झाल्याची नोंद नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग १ आणि वर्ग २ यांच्याकडून अहवाल मागवले.