|
मुंबई – मुख्यमंत्र्यांनी बारामती येथील कामांना दिलेली स्थगिती उठवावी, तसेच सूडबुद्धीने कोणताही निर्णय घेऊ नये, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह १८ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महाविकास आघाडी शासनाने संमत केलेल्या ९४१ कोटी रुपयांच्या नगरविकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्थगिती दिली आहे. यातील २४५ कोटी रुपयांची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेते होते.