ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल, तर त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फॉक्सकॉन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती. शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच अशी बैठक घेऊन आस्थापनाला भरीव पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाणे येथे पत्रकारांशी बोलतांना केला, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून त्यादरम्यान मोदी यांनी ‘फॉक्सकॉन’ पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचे सांगितले आहे, असा दावा मंत्री सामंत यांनी केला आहे.