मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका वेळेत पडताळून होण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात येतील, तसेच त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना काढण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत दिले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी १२ वीच्या ५० लाख उत्तरपत्रिका पडताळल्याविना पडून असल्याचे सूत्र सभागृहात उपस्थित केले. निकाल वेळेवर लागला नाही, तर आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होईल, हा विषय माहितीच्या सूत्राच्या अनुषंगाने सभागृहात उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.