देशात कुष्ठरोग्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात !

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे आणि त्यांना नोकर्या उपलब्ध करून देणे याविषयी सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी संबंधित तज्ञ आणि अधिकारी यांची समिती गठीत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कुष्ठरोगी यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, पुनर्वसन आणि नोकर्या यांविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
“कुष्ठरोग निर्मूलन झालेल्या रूग्णांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र का दिलं जात नाही?” जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न; तानाजी सावंतांनी दिलं उत्तरhttps://t.co/kZ5X7ENup0@dhananjay_munde @mieknathshinde @TanajiSawant4MH #Marathinews #NewsUpdate
— LoksattaLive (@LoksattaLive) February 28, 2023
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कुष्ठरोग्यांचा शोध घेण्यासाठी राज्यात ६० सहस्र गटांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये ८ कोटी ६६ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. या शोधमोहिमेत एकूण १७ सहस्र १४ कुष्ठरोगी सापडले आहेत. वर्ष २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त धोरण केंद्रशासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे राज्यात काम करण्यात येईल, असे सांगितले.
याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘कुष्ठरोगी आपलेच समाजबांधव आहेत. त्यांची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. याविषयी सर्वकष धोरण निश्चित करावे लागेल. महाराष्ट्रात जेथे-जेथे कुष्ठरोग्यांच्या वसाहती आहेत, तेथे मूलभूत सुविधा देणे सरकारचे कर्तव्यच आहे. कुष्ठरोग्यांच्या विषयांसाठी गठीत करण्यात येणार्या समितीमध्ये याविषयी काम करणारे प्रकाश आमटे, विकास आमटे यांसह तज्ञांचा समावेश करून घेऊ. मुख्यमंत्री स्वयंरोजगारामध्येही कुष्ठरोगींना सहभागी करण्यात येईल.’’
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !