विधानसभेत विधानसभा अध्यक्ष निवडीवरून खडाजंगी; नियमांवर बोट ठेवत विरोधकांकडून सभात्याग !

विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पहिल्या दिवशी झाले कामकाज !

पहिल्या दिवशी कामकाज न करण्याच्या विधीमंडळाच्या परंपरेला छेद !

अमरावती हिंसाचार प्रकरणी विधानसभेत आवाज उठवला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ! महाराष्ट्रात लोकशाही नव्हे, तर ‘रोकशाही आणि रोखशाही’चे राज्य आहे !

सभागृहातील सर्व चर्चांना उत्तरे देण्यास शासन सिद्ध ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने मांडली भूमिका

हिवाळी अधिवेशन प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाचणीत ८ जण कोरोनाबाधित !

२२ डिसेंबरपासून चालू होणार्‍या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन प्रवेशासाठी दक्षता म्हणून पत्रकार, अधिकारी आणि आमदार यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी करण्यात आली. एकूण २ सहस्र ६७८ जणांची ही चाचणी करण्यात आली आहे.

अधिवेशनाला सामोरे जाण्यास सरकारची सिद्धता नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

२९ नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

हिवाळी अधिवेशन मुंबईत; कामकाज केवळ ५ दिवसच चालणार !

२९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुढील पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याची मागणी !

नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होणे अपेक्षित आहे. यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आहे…

हिवाळी अधिवेशन मुंबई येथे घेण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय !

२९ नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळ कामकाज समितीची बैठक होणार असून या बैठकीत अधिवेशन कोणत्या दिवशी घ्यायचे ? हे निश्चित करण्यात येईल.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या स्थळाविषयी शासनात मतभिन्नता !

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी ७ डिसेंबर हा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दिनांक घोषित करण्यात आला; मात्र अधिवेशन मुंबई कि नागपूर येथे घ्यावे ?, याचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाची कुचंबणा झाली आहे.