पहिल्या दिवशी कामकाज न करण्याच्या विधीमंडळाच्या परंपरेला छेद !
मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – विधीमंडळाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव घेऊन सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची आतापर्यंतची परंपरा आहे; मात्र तिला छेद देऊन २२ डिसेंबर या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामाला प्रारंभ करण्यात आला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत तारांकित प्रश्नांवर शासनाकडून उत्तरे देण्यात आली, तसेच सभागृहाच्या पटलावर अध्यादेश आणि कागदपत्रे ठेवण्यात आली. (जनतेच्या निधीतून अधिवेशनाचा व्यय होतो, याची जाणीव ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी अधिवेशनाच्या काळात अधिकाधिक कामकाज करून जनतेचे प्रश्न सोडवणे हेच अपेक्षित आहे. – संपादक)