कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बँकांना सूचना देणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ अंतर्गत ३२.८२ लाख पात्र कर्ज खाती असून आधार प्रमाणीकरण झालेल्या ३२.१९ लाख कर्जखात्यांपैकी ३१.७१ लाख कर्जखात्यांना २० सहस्र २५० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

एस्.टी. कर्मचार्‍यांचे विलगीकरण शक्य नसल्याची परिवहनमंत्र्यांची विधान परिषदेत स्पष्टोक्ती !

कर्मचार्‍यांच्या अन्यही काही मागण्या असतील, तर त्या चर्चेने सोडवता येतील; मात्र एस्.टी कर्मचार्‍यांचे विलगीकरण शक्य नाही, अशी स्पष्टोक्ती परिवहनमंत्र्यानी विधान परिषदेत केली.

राज्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीजजोडणी तोडण्यावरून विधानसभेत गदारोळ !

कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावातील शेतकरी सूरज जाधव यांनी फेसबूकवरून त्यांच्या आत्महत्येचे थेट प्रक्षेपण करून आत्महत्या केली. याचे पडसाद ७ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.

देशातील सर्वांत मोठा औषध निर्माण प्रकल्प रायगड येथे विकसित करण्याचा केंद्रशासनाचा प्रस्ताव !

केंद्रशासनाच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाद्वारे रायगड येथे औषध निर्माण उद्योग समूह विकसित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राकडे करण्यात आला आहे. अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या भूमीच्या अपहाराप्रकरणी १५ जणांवर गुन्हा नोंद ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल, तर वक्फ मंडळाला देण्यात येणारे अनुदान सरकारने त्वरित बंद करावे !

थकबाकीमुळे नव्हे, तर भ्रष्टाचारामुळे महावितरण डबघाईला ! – आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

भ्रष्टाचारामुळे शासकीय आस्थापने डबघाईला आणणार्‍यांवर सरकार कारवाई कधी करणार ?

शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण करणार्‍यांच्या विजयाला ‘शौर्यदिन’ कसे घोषित करू शकतो ? – दिवाकर रावते, शिवसेना

कोरेगाव येथे इंग्रजांच्या समवेत झालेल्या लढाईमध्ये ‘महार रेजिमेंट’ इंग्रजांच्या बाजूने लढले. त्यामुळे महार समाजाला ‘महार रेजिमेंट’चा अभिमान वाटत असेल; मात्र हे चुकीचे आहे. इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण केले होते.

जत (जिल्हा सांगली) तालुक्यात खाद्यपदार्थांची विनाअनुमती सर्रास विक्री  निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरून भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष ! – काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खाद्यपदार्थांची विनाअनुमती सर्रास विक्री होत असून निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरून भेसळयुक्त पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ विक्री केली जात असल्याचे जानेवारी २०२२ मध्ये निदर्शनास आले आहे.

रुग्णसंख्येनुसार मनुष्यबळ पुरवण्यावर भर ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री

कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन अकोला येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मनुष्यबळाची जशी आवश्यकता लागेल, त्याप्रमाणे मनुष्यबळ पुरवण्यावर भर दिला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

जानेवारी २०२२ मध्ये ९२ माता, तर १ सहस्र १६६ अर्भक यांचा मृत्यू !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही राज्यात अर्भक आणि माता यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असणे लज्जास्पद आहे !