दत्त इंडिया साखर कारखान्‍यासह महापालिकेवर गुन्‍हा नोंद करणार !- जगन्‍नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

सांगलीत कृष्‍णा नदीमध्‍ये झालेल्‍या लाखो माशांच्‍या मृत्‍यूचे प्रकरण !

कोल्‍हापूर, १४ मार्च (वार्ता.) –  सांगलीत कृष्‍णा नदीत लाखो मासे मृत्‍यूमुखी पडल्‍याच्‍या प्रकरणी सांगलीतील दत्त इंडिया साखर कारखाना, स्‍वप्‍नपूर्ती डिस्‍टीलरी, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका यांच्‍यावर फौजदारी गुन्‍हा नोंद करण्‍याची प्रक्रिया चालू करण्‍यात आली आहे. दत्त इंडिया साखर कारखान्‍याची वीज आणि पाणी जोडणी तोडण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. या प्रकरणी प्रदूषण मंडळ कठोर कारवाई करेल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्‍नाथ साळुंखे यांनी दिली.

जगन्‍नाथ साळुंखे पुढे म्‍हणाले, ‘‘यापुढील काळात प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण करणार्‍या आस्‍थापनांची गय करणार नाही आणि कठोर कारवाई करेल. इचलकरंजी येथे या पुढील काळात पंचगंगा नदीच्‍या प्रकरणी प्रदूषण करणार्‍या आस्‍थापनांवर कारवाई करण्‍यात येईल. तरी प्रत्‍येक आस्‍थापनाने प्रदूषण न होण्‍याच्‍या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेच पाहिजे.’’