महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनवणार्‍या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने निषेध आंदोलन !

राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये ‘वाईन विक्री’ला अनुमती दिली आहे. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनवणार्‍या सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांचे मांस घेऊन वाहतूक करणारा पोलिसांच्या कह्यात !

गोसावी गल्लीतून गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या एकास पोलिसांनी अधिक अन्वेषण करण्यासाठी कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८०० किलो मांस कह्यात घेण्यात आले आहे.

पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नी प्रदूषण मंडळाची महापालिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस !

नेहमीप्रमाणे प्रदूषण मंडळाची ‘वरातीमागून घोडे’ याप्रमाणे कारवाई !

कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा भाजपचा प्रयत्न !

महानगरपालिकेकडे साठलेला आणि कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता.

केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर अल्प करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा ! – शिवसेनेचे कागल तहसीलदारांना निवेदन

ल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामासाठी १ लाख ७५ सहस्र टन, तर खरीप हंगामासाठी १ लाख ४२ सहस्र टन इतके रासायनिक खत शेतकर्‍यांना लागते. अगोदरच पिकवलेल्या शेतीमालाला दर नाही, अशी स्थिती आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राज्यव्यापी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवले जाते. पश्चिम महाराष्ट्रात या अभियानांतर्गत घडलेल्या घडामोडी येथे देत आहोत.

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे प्राणवायूअभावी माशांची तडफड आणि मृत्यू !

यामुळे कोल्हापूरसह इचलकरंजी येथेही पाणी प्रदूषण रोखण्यात प्रशासन असमर्थ ठरत असून प्रदूषण विभागही डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोल्हापूर येथे १० लाख रुपयांची लाच घेतांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील २ हवालदारांना अटक !

भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कडक शासनासह जनतेला धर्मशिक्षण द्यायला हवे !

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील ३ शिधावाटप केंद्रांचे परवाने रहित !

शिधावाटप केंद्रांवर कुणाचा अंकुश नाही, याचे हे उदाहरण ! या केंद्रांचे परवाने रहित करण्यासमवेत त्यांना कठोर शिक्षा होणेही अपेक्षित आहे.

‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना’च्या अंतर्गत कोल्हापूर महापालिकेस २३७ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीस संमती ! – राजेश क्षीरसागार, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

या निधीतून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख ८२ रस्त्यांचे सक्षमीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे