

कोल्हापूर, २९ जानेवारी (वार्ता.) – राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये ‘वाईन विक्री’ला अनुमती दिली आहे. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनवणार्या सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. यानंतर हा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अजित सूर्यवंशी, प्रदीप उलपे, अजित ठाणेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, लता बर्गे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !