पाकमधील ‘ओआयसी’ परिषदेत चीनचा सहभाग !

हा पाक आणि चीन यांचा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे ! आगामी काळात सरकार एकाच वेळी पाक आणि चीन यांचा सामना कसा करणार आहे ?

(म्हणे) ‘भारताचे क्षेपणास्त्र आमच्या सीमेत पडल्यानंतर प्रत्युत्तर देऊ शकलो असतो; मात्र आम्ही संयम दाखवला !’ – पाकचे पंतप्रधान

भारताचे चुकून सुटलेले क्षेपणास्त्र पाकला ते रोखता आले नाही. क्षेपणास्त्र रोखू न शकणारे पाकचे पंतप्रधान प्रत्युत्तर देण्याची भाषा करतात, हे हास्यास्पदच !

पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का? ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पाश्‍चात्त्य देशांना प्रश्‍न

युरोपीयन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक प्रमुखांनी १ मार्च या दिवशी संयुक्त पत्राद्वारे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारणसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानला आवाहन केले होते.

काश्मीरचा प्रश्‍न सुटेपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात अणूयुद्धाची भीती ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरचा प्रश्‍न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा !

(म्हणे) ‘काश्मीरचा प्रश्‍न शांततेने सोडवला पाहिजे !’ – चीन

काश्मीरचा प्रश्‍न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्‍या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !

काश्मीरला नष्ट करण्यामागे पाकचाच हात ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याचा आरोप

भारतातील पाकप्रेमी, काश्मीरमधील पाकप्रेमी राजकीय पक्ष अन् त्यांचे नेते यावर काही बोलतील का ?

(म्हणे) ‘मोदी सरकार काश्मिरी लोकांना दाबण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करत आहे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

पाकला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे !

‘काश्मीरचा वाद चर्चेद्वारे सोडवला पाहिजे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरचा प्रश्‍न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.

नवज्योतसिंह सिद्धू यांना मंत्री बनवण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि निकटवर्तीय यांनी शिफारस केली होती ! – कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा गौप्यस्फोट

अमरिंदर सिंह यांच्या या दाव्याची चौकशी करून तो खरा असेल, तर नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ असून त्यांचे (सरकार) जाणे, हाच पाकमधील समस्यांवर एकमेव उपाय !

पाकमध्ये आर्थिक संकटांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समवेत केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ बनले आहेत.  पाक सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत.