इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ असून त्यांचे (सरकार) जाणे, हाच पाकमधील समस्यांवर एकमेव उपाय !

पाकमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाचे प्रमुख सिराजुल हक यांचे विधान

डावीकडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाचे प्रमुख सिराजुल हक

लाहोर (पाकिस्तान) – पाकमध्ये आर्थिक संकटांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समवेत केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ बनले आहेत.  पाक सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत. इम्रान खानचे (सरकार) जाणे, हाच सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे, असे विधान ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाचे प्रमुख सिराजुल हक यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सिद्धतेच्या संदर्भात लाहोरमध्ये एका सभेला  संबोधित करतांना हक यांनी हे विधान केले.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली असल्याने त्याची दिवाळखोरी जगजाहीर आहे. तेथे महागाई सर्वकालीन उच्चांकावर आहे, ज्यामुळे मूलभूत गरजांच्या किंमती वाढल्या आहेत. तेथे व्यापाराचीही गती मंदावली आहे.