(म्हणे) ‘भारताचे क्षेपणास्त्र आमच्या सीमेत पडल्यानंतर प्रत्युत्तर देऊ शकलो असतो; मात्र आम्ही संयम दाखवला !’ – पाकचे पंतप्रधान

  • क्षेपणास्त्र रोखू न शकणारे पाकचे पंतप्रधान प्रत्युत्तर देण्याची भाषा करतात, हे हास्यास्पदच ! – संपादक 
  • भारताचे चुकून सुटलेले क्षेपणास्त्र पाकच्या सीमेमध्ये १२४ किमी अंतरावर जाऊन पडले; मात्र पाकला ते रोखता आले नाही. भारताने खरोखरंच पाकला लक्ष्य करून अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र डागले असते, तर पाकला ते रोखता आले असते का ? – संपादक 
पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतीय क्षेपणास्त्र आमच्या सीमेमध्ये पडल्यानंतर आम्ही भारताला प्रत्युत्तर देऊ शकलो असतो; मात्र आम्ही संयम दाखवला, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान केले.

९ मार्च या दिवशी भारताचे एक क्षेपणास्त्र चूकून सुटून पाकमध्ये जाऊन पडले होते. यात कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नव्हती.