(म्हणे) ‘मोदी सरकार काश्मिरी लोकांना दाबण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करत आहे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. यामध्ये पाकने ढवळाढवळ करू नये’, असे भारत पाकला सांगील; मात्र असे सांगून काही साध्य होणार नाही. त्यासाठी पाकला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे ! – संपादक

पाकचे पंतप्रधान इम्रान खान

बीजिंग (चीन) – आंतरराष्ट्रीय समुदाय काश्मीरमध्ये निष्पक्ष जनमत घेण्यात अयशस्वी ठरला आहे. आता या समुदायाने भारतीय सैन्याच्या कह्यातून काश्मिरी लोकांना मुक्त करण्याच्या त्या लोकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करू नये. मोदी सरकार काश्मिरी लोकांना दाबण्यासाठी हुकूमशाही नीतीचा अवलंब करत आहे, असा आरोप पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी येथे केला. ते सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत.

खान पुढे म्हणाले की, भारत काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे, तसेच याद्वारे तेथे लोकसंख्या पालटण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व ‘जिनेव्हा करारा’चे उल्लंघन आहे. मोदी सरकारची हुकूमशाही धोरणे काश्मिरी लोकांचा विरोध मोडून काढू शकलेली नाही.