कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार होणे शक्य ! – सागर जावडेकर, संपादक, दैनिक ‘तरुण भारत’, गोवा आवृत्ती

कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार होणे शक्य ! – सागर जावडेकर, संपादक, दैनिक ‘तरुण भारत’, गोवा आवृत्ती

देव, देश आणि धर्म हे विषय आपल्या संस्कृतीशी जोडलेले असल्याने या गोष्टींचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कीर्तन हे लोकशिक्षण आणि प्रबोधन यांचे प्रभावी माध्यम आहे.

राष्ट्र्रभाव : भारतीय संस्कृती, म्हणजेच हिंदु संस्कृती !

राष्ट्र्रभाव : भारतीय संस्कृती, म्हणजेच हिंदु संस्कृती !

भारतीय संस्कृतीची ‘स्वीकार’ आणि ‘समन्वय’ यांची परंपरा प्राचीन काळापासूनच आहे. या संस्कृतीने द्वैत, अद्वैत, विशिष्ट द्वैत, सगुण, निर्गुण, आस्तिक, नास्तिक (चार्वाक, बुद्ध), वेद हे अर्थहीन असल्याचे मत, बौद्ध आणि जैन मते अशी सर्व प्रकारची उलटसुलट अन् काही परस्परविरोधी मते सामावून घेतली आहेत. येथील आध्यात्मिक विचारांमध्ये द्वैतवादी आणि अद्वैतवादी आदी अनेक पंथ आहेत.

आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

नामस्मरण हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. त्यालाच ‘भजन’ असेही म्हणतात. त्या मूळ स्वभावापासून दूर गेल्यामुळेच आपण हिंदू दुःखी झालो आहोत. त्यामुळे मनुष्य सत्ययुगातून त्रेतायुगात, त्यातून द्वापरयुगात, असे होत होत आता कलियुगात आला आहे.

यमद्वितीयेचे रहस्य !

यमद्वितीयेचे रहस्य !

‘कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस ‘यमद्वितीया’ या नावाने भारतवर्षांत प्रसिद्ध आहे. त्या निमित्ताने…

दिवाळीनिमित्त आस्थापनांच्या विज्ञापनांमध्ये बहुतांश मॉडेल्सना कुंकू-टिकली विना दाखवले !

दिवाळीनिमित्त आस्थापनांच्या विज्ञापनांमध्ये बहुतांश मॉडेल्सना कुंकू-टिकली विना दाखवले !

हिंदूंच्या सण-उत्सवांमध्ये पैसा कमवणार्‍या; परंतु हिंदूंच्या धार्मिक परंपरेला डावलणार्‍या आस्थापनांच्या वस्तू खरेदी करायच्या का ? याचा विचार आता हिंदूंनीच करणे आवश्यक आहे !

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल !

धर्म-राष्ट्र जागृती करणारा ‘सनातनचा आकाशकंदिल’

धर्म-राष्ट्र जागृती करणारा ‘सनातनचा आकाशकंदिल’

हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच दिवाळी ही खर्‍या अर्थाने साजरी होऊ शकेल. हाच संदेश सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सनातन संस्था’ धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती करणारे लिखाण असलेल्या आकाशकंदिलाची निर्मिती करते.

देवदिवाळी

देवदिवाळी

आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य मुख्य अन् उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोचवण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी

मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन कृष्ण चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले.

‘दीप’

‘दीप’

‘दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति ।’ म्हणजे ‘स्वतः प्रकाशतो आणि दुसर्‍यांना प्रकाशित करतो तो दीप.’ दीप किंवा दीपज्योत हे बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी प्रकाशज्योतीकडे ने’, असा त्याचा अर्थ आहे.