
कल्याण, २८ जुलै (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि विनापरवाना औषधसाठा करणार्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार कल्याण (पूर्व) येथील ‘मे. प्रकाश पॉलिक्लिनिक अँड हेल्थ हॉस्पिटॅलिटी’वर अन्न व औषध प्रशासन अन् आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने धाड घातली. या कारवाईत १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधांचा साठा जप्त करण्यात आला. औषधांचे नमुने पडताळणीसाठी घेण्यात आले असून पुढील चौकशी चालू आहे. (नागरिकांच्या जिवाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !
अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम