हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !

मुंबई – आज केवळ ‘लव्ह जिहाद’च नव्हे, तर ‘व्यावसायिक जिहाद’, धर्मांतर आणि खोटी कथानके यांसारख्या संकटांनी हिंदु धर्मावर चहूबाजूंनी आघात होत आहेत. या छुप्या आणि वैचारिक शत्रूंना कसे ओळखावे अन् धर्मरक्षणासाठी हिंदूंनी कसे संघटित व्हावे, यावर मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जुलै या दिवशी देशभरात ६४ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि साधनेची दिशा’ यावर ज्वलंत विचार मांडले जाणार असून धर्मरक्षण आणि स्वसंरक्षणाची दिशा देणार्‍या या महोत्सवात हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.