मुंबई, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – दिवाळीनिमित्त विविध आस्थापनांनी दागिने, कपडे यांसह विविध भेटवस्तू यांच्या विक्रीसाठी विशेष सवलतींची विज्ञापने वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केली आहेत. यांतील बहुतांश आस्थापनांच्या विज्ञापनांत युवती आणि महिला यांना कुंकू किंवा टिकली यांविना दाखवण्यात आले आहे. हिंदूंच्या सणांमध्ये युवती-महिला यांनी कपाळाला टिकली किंवा कुंकू लावणे या धार्मिक परंपरांना महत्त्व असतांना बहुतांश आस्थापने हिंदूंच्या या धार्मिक परंपरेला जाणीवपूर्वक डावलत असल्याचे दिसून येत आहे.
कुंकू अथवा टिकली विना असलेल्या मॉडेल्सची दिवाळीनिमित्त प्रसारित केलेली विज्ञापने !
‘शॉपर्स स्टॉप’ या प्रसिद्ध आस्थापनाच्या ऑनलाईन विक्रीच्या संकेतस्थळावर दिवाळीनिमित्त कपड्यांसह विविध भेटवस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत; परंतु या विज्ञापनात असलेल्या एकाही युवतीने कुंकू किंवा टिकली लावलेली नाही.
‘मेलोरा’ (Melorra) या सोने विक्रीच्या आस्थापनाच्या विज्ञापनात युवतीच्या कपाळाला कुंकू किंवा टिकली लावण्यात आलेली नाही.
आय्.सी.आय्.सी.आय्. बँकेच्या सोन्याच्या खरेदीसाठी विशेष परतावा देण्याविषयीच्या विज्ञापनातील युवतीच्या कपाळाला कुंकू किंवा टिकली नाही.
‘टी.बी. झेड्’ या सोने विक्रीच्या आस्थापनाने दिवाळीनिमित्त काढलेल्या विज्ञापनात सारा खान या मुसलमान अभिनेत्रीला दाखवण्यात आले आहे. त्यातही तिने कपाळाला कुंकू किंवा टिकली लावलेली नाही.
‘पी.सी. चंद्रा’ या हिरे आणि सोने विक्रीच्या आस्थापनाच्या एकाही विज्ञापनात महिलांच्या कपाळाला कुंकू किंवा टिकली नाही. अशा अनेक आस्थापनांनी दिवाळीनिमित्तच्या विज्ञापनांमध्ये महिलांना कुंकू-टिकली यांच्याविना दाखवले आहे.
Say it loudly and proudly. #NoBindiNoBusiness. Thank you @prachyam7 for this awesome video. You can watch the full 3 minutes video here https://t.co/VzWJdMgQ77 pic.twitter.com/Nf0NHWUzAH
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) October 23, 2022
________________________
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या सण-उत्सवांमध्ये पैसा कमवणार्या; परंतु हिंदूंच्या धार्मिक परंपरेला डावलणार्या आस्थापनांच्या वस्तू खरेदी करायच्या का ? याचा विचार आता हिंदूंनीच करणे आवश्यक आहे ! |