पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये साधकांनी दिवाळीनिमित्त आकाशकंदिल आणि भेटसंच वितरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांपैकी सोलापूर जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न येथे दिले आहेत.
१. कुमठानाका
१ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे एक वाचक : ‘कुमठानाका येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकांना आकाशकंदिलाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी काही कंदिलांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा आणखी काही कंदिलांची मागणी केली. ते दीपावलीच्या सणानिमित्त गरजू मुलांना विनामूल्य फराळ देतात. त्या समवेत त्यांनी सर्वांना आकाशकंदिल दिले. अनुपस्थित मुलांना त्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन कंदिल दिले. आकाशकंदिल देतांना त्यांनी मुलांना सांगितले, ‘‘पाऊस पडत असल्यास आकाशकंदिल घरात लावा.’’ त्यांच्या मुलीनेही काही आकाशकंदिल घेऊन नातेवाइकांना दिले.
१ आ. श्री. नितीन बत्तुल : यांना आकाशकंदिलाविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी लगेच ‘सनातन संस्थे’च्या आकाशकंदिलांची मागणी केली.’
– सौ. अलका रोडी, कुमठानाका, सोलापूर.
२. सोलापूर
२ अ. श्री. भरत परदेशी (वर्गणीदार) : ‘यांनी त्यांच्या दुकानात आकाशकंदिल लावले होते. ते बघून त्यांच्याकडे येणार्या ग्राहकांनी विचारले, ‘‘आकाशकंदिल छान आहेत. आम्हालाही मिळतील का?’’ तेव्हा श्री. परदेशी यांनी मला कळवल्यावर त्या ग्राहकांना मी आकाशकंदिल नेऊन दिले.’
– सौ. सुनिता न्यामने, सोलापूर
३. लातूर
३ अ. एक दुकानदार : ‘आम्ही लातूर येथे मागणी असलेले आकाशकंदिल देण्यासाठी गेलो होतो. तेथील एका घरातील ताई घरी नसल्यामुळे आम्ही त्यांची वाट पहात थांबलो होतो. त्या वेळी त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील दुकानदाराला आमच्या हातातील आकाशकंदिल पुष्कळ आवडला. त्यामुळे त्यांनी तो घेऊन त्यांच्या दुकानात लावला. नंतर त्यांनी लगेच काही आकाशकंदिल घेतले आणि त्यांच्या मित्रांना आकाशकंदिलांविषयी सांगून त्यांनाही घ्यायला लावले.
३ आ. आकाशकंदिलामुळे त्रास दूर होण्यासंदर्भात आलेल्या अनुभूती
३ आ १. आकाशकंदिलामुळे मनातील सर्व विचार नष्ट होणे : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदार श्रीमती सुमन अरुण जाधव यांच्याकडे त्यांची एक मैत्रीण आली होती. तिला पुष्कळ निराशा आली होती. श्रीमती जाधव यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून ती त्यांच्या घरी आली होती. ती बोलत असतांना मध्येच थांबली आणि म्हणाली, ‘‘मला या घरात पुष्कळ शांत, तसेच मंदिरात आल्यासारखे वाटत आहे. माझ्या मनातील सर्व विचार नष्ट होत आहेत. तू घरात असे काय करतेस ?’’ तिने असे विचारल्यावर श्रीमती जाधव यांनी तिला वर लावलेला ‘सनातन संस्थे’चा आकाशकंदिल दाखवला आणि सांगितले, ‘‘त्याची (आकाशकंदिलाची) लीला आहे.’’ त्यानंतर दोघींनी आकाशकंदिलाला नमस्कार केला.
ही अनुभूती श्रीमती जाधव सांगत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पुढील वचनाचे मला स्मरण झाले.
स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा ।
कैसे असू सर्वदा सर्वां ठायी ।
सनातन धर्म माझे नित्य रूप ।
त्या रूपे सर्वत्र आहे सदा ।।
‘सनातन संस्थेची सर्व उत्पादने गुरुदेवांचे निर्गुण रूप आहे’, ही माझी श्रद्धा दृढ झाली.
– सौ. मीना नकाते, सोलापूर
४. बार्शी
४ अ. एक धर्मप्रेमी : ‘यांनी परांडा येथील २ मंदिरांमध्ये प्रायोजित केलेले आकाशकंदिल लावण्याची सेवा केली.
४ आ. श्री. रवि वैद्य (धर्मप्रेमी) : यांनी एका मित्राच्या दुकानात आकाशकंदिल लावले. ‘‘आकाशकंदिल लावल्यावर ३ दिवस त्यांचा व्यवसाय पुष्कळ चांगला चालला’’, असे त्यांनी सांगितले. ‘‘पुढच्या वर्षी परांडा येथेच आकाशकंदिलांची सिद्धता करण्याची सेवा करीन’’, असे श्री. रवि वैद्य यांनी स्वत:हून सांगितले.
४ इ. श्री. मनोज नलावडे (धर्मप्रेमी) : यांनी आकाशकंदिल देण्याची आणि ते लावण्याची सेवा छान केली.
४ ई. मंदिरांमध्ये आकाशकंदिल लावल्यावर बर्याच जणांनी पुढच्या वर्षीसाठी आकाशकंदिलांची मागणी केली आहे.’
– सौ. दमयंती रोडे, परांडा, बार्शी, जिल्हा सोलापूर.
५. सांगोला
५ अ. वनिता वाघमारे (धर्मप्रेमी) : ‘यांनी स्वत: हून सेवेसाठी भ्रमणध्वनी केला, तसेच त्यांनी आकाशकंदिल बनवण्याची सेवा पुष्कळ तळमळीने करून २ दिवसांत ती पूर्ण केली.
५ आ. श्री. नवनाथ कावळे (धर्मप्रेमी) : यांनी आकाशकंदिल घेऊन आपले नातेवाईक आणि मित्र यांना भेट दिले.
५ इ. हितचिंतक आणि धर्मप्रेमी : सांगोला गावाजवळ १० – १५ कि.मी. अंतरावर असलेल्या ५ गावांमधून हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी आकाशकंदिलांची मागणी केली होती. त्यांनी स्वतःहून भ्रमणभाषद्वारे संपर्क केला आणि सांगोला गावात येऊन ते आकाशकंदिल घेऊनही गेले.’
– सौ. शुभांगी पाटणे, सांगोला, जिल्हा सोलापूर.
६. धाराशिव
‘गुरुमाऊलींच्या कृपेमुळे अर्पणातून मिळालेले आकाशकंदिल मंदिरांत लावण्याची सेवा मिळाली. तेव्हा ती सेवा करत करत आम्ही अंबाबाईच्या मंदिरात पोचलो. श्री अंबाबाईच्या मंदिरात एक भजनी मंडळ बसले होते. त्यांनी आमच्या हातातील आकाशकंदिल पहाताच कृतज्ञतेने त्याविषयी आम्हाला विचारले. ‘सनातन संस्थे’चे नाव ऐकताच काही जणांचा भाव जागृत झाला. त्यानंतर त्यांना आम्ही कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगितले. त्या वेळी सर्वांच्या चेहर्यावर चैतन्य दिसले. त्यांनी प्रसन्नतेने आणि प्रीतीने शंका विचारल्यामुळे आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुकृपेमुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला या सेवेतून आनंद मिळाला.’
– श्री. नवनाथ राऊत आणि श्री. राकेश मुंडे
– संग्राहक : पू. दीपाली मतकर (सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संत, वय ३६ वर्षे), सोलापूर (१३.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |