भगवंत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे, तसेच आनंदी अन् सहजावस्थेत रहाणारे पू. राजाराम नरुटे (वय ९१ वर्षे) !

वयस्कर व्यक्तीही गुरुकृपेने योग्य वागून आणि साधना करून आनंदात राहू शकते अन् आध्यात्मिक प्रगती करू शकते, हे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. नरुटेआजोबा यांनी शिकवले

साधकांना घडवण्यासंदर्भात जाणवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये !

परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वागतकक्षात सेवा करणार्‍या साधिकेला अध्यात्मप्रचाराचे कार्य करायला शिकवले आणि त्यांच्या कृपेने आता ती साधिका महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांत अध्यात्मप्रचाराची सेवा करत आहे…

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ७ वर्षे) यांना बालवयातच यज्ञाविषयी असलेली जाण आणि त्यांनी त्याचे श्रेय संतांना देणे

वैशाख शुक्ल दशमी (१८.५.२०२४) या दिवशी सनातनचे पहिले संत पू. भार्गवराम प्रभु यांचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पणजी पू. (श्रीमती) राधा प्रभु यांना जाणवलेली त्यांची यज्ञाविषयी जिज्ञासा आणि जाण येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि ‘साधकांचा उद्धार व्हावा’, यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर होतात. ‘गुरुदेवांनी सांगितलेली साधना कशी करायला हवी ?’, यासाठी त्या सातत्याने मार्गदर्शन करतात.

भगवंताने ठेवलेल्या परिस्थितीत साधना करणे, ही तपस्या आहे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन

सिंधुदुर्ग : सावंतवाडीत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता

सावंतवाडी येथील श्री. संजय ठाकूर आणि श्री. अविनाश सुभेदार यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सोहळ्यास सावंतवाडीतील नागरिकांसह प.पू. भाऊ मसुरकर यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना त्यांचे वडील पू. सत्यनारायण तिवारी यांची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

माझ्या मनात प्रार्थना आणि सेवा यांचे विचार असतील किंवा मी नामजप करत असेन, तेव्हा पू. बाबा माझ्याकडे अधूनमधून शांतपणे पहायचे. त्या वेळी ‘संतांच्या सहवासात आपले सतत परीक्षण होत असते’, असे मला वाटले. 

सिंधुदुर्ग : प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सावंतवाडी येथे विष्णुयाग

सावंतवाडी येथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास ३० एप्रिल या दिवशी प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एकामागून एक येणार्‍या निरनिराळ्या विषयांवर संबंधित साधकांना अचूक मार्गदर्शन करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मार्गदर्शन करतांना सांगतात, ‘एकदा अध्यात्माचे ज्ञान झाले की, जगातील सर्व विषयांचे ज्ञान होते. प्रत्येक विषयाचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही.

पू. मनीषाताई आहे शुद्ध, सात्त्विक आणि दैवी गुणांचे भांडार ।

ताईच्या वाणीतून मिळे साधनेला प्रोत्साहन । ताईची सेवा असते विसरून देहभान ।।
ताई आहे शुद्ध, सात्त्विक अन् दैवी गुणांचे भांडार । ताईची आहे गुरूंवर श्रद्धा अपार ।।