‘भोर (पुणे) येथे एका सेवेनिमित्त मला सौ. मनीषा महेश पाठक यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये कवितेतून व्यक्त करत आहे.
सर्व साधकांच्या मनातील
जाणून घेई मनीषाताई ।
आम्हाला वाटे जणूकाही आमचीच प्रेमळ आई ।। १ ।।
ताईच्या वाणीतून मिळे साधनेला प्रोत्साहन ।
ताईची सेवा असते विसरून देहभान ।। २ ।।
ताई आहे शुद्ध, सात्त्विक अन् दैवी गुणांचे भांडार ।
ताईची आहे गुरूंवर श्रद्धा अपार ।। ३ ।।
– सौ. पुष्पा महेंद्र अहिरे, भोर, पुणे. (१५.२.२०२३)
सद्गुणांची खाण असणारी पू. मनीषाताई ।
असे सगळ्यांची लाडकी मनीषाताई ।
वय लहान असूनही मोठ्यांनाही आईसारखा आधार देणारी ।। १ ।।
प्रत्येक जिवाला साधनेची ओढ लावणारी ।
प्रेमाने शिस्त समजावून सांगणारी ।। २ ।।
सद्गुणांची खाण असणारी ।
संतांचा प्रत्येक शब्द आज्ञापालन म्हणून स्वीकारणारी ।। ३ ।।
– सौ. प्रीती नीलेश जोशी, लांजा, रत्नागिरी. (१५.२.२०२३)
(‘कविता केलेल्या दिवशी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना ‘संत’ म्हणून घोषित केलेले नव्हते; म्हणून त्यांचा उल्लेख कवितेत ‘पू. मनीषाताई’, असा केलेला नाही.’ – संकलक)