सावंतवाडी : येथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला ३० एप्रिल या दिवशी प्रारंभ होऊन १ मे या दिवशी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. ३० एप्रिलला येथील श्री विठ्ठल मंदिरात विष्णुयाग पार पडला.
१ मे या दिवशी सकाळी ६ वाजता सौ. रोहिणी आणि श्री. अविनाश सुभेदार (निवृत्त सचिव, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात महापूजा, सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, श्री विठ्ठल मंदिराच्या कार्यात योगदान देणार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार, असे कार्यक्रम झाले. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन सनातनचे साधक श्री. दिलीप आठलेकर यांनी केले. सावंतवाडी येथील श्री. संजय ठाकूर आणि श्री. अविनाश सुभेदार यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सोहळ्यास सावंतवाडीतील नागरिकांसह प.पू. भाऊ मसुरकर यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : सावंतवाडीत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता
वाचा :https://t.co/bU0jCUv5Su
या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन सनातनचे साधक श्री. दिलीप… pic.twitter.com/Ku8GHIPjJZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2024
हे ही वाचा – सिंधुदुर्ग : प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सावंतवाडी येथे विष्णुयाग