परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत.

प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करणारे पू. भाऊकाका (पू. अनंत आठवले) आणि साधकांना परिपूर्ण घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉक्टर, केवळ आपल्यामुळेच आम्हाला ‘परिपूर्णता’ या शब्दाचा अर्थ कळत आहे आणि आपण आम्हाला परिपूर्णतेच्या मार्गावरून घेऊन जात आहात. या मार्गावर आपण आम्हा सर्व साधकांच्या समवेत आहात, हाच आमच्या मनुष्य जन्मातील खरा आनंद आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

देव आपल्या कामात कधी काही चुकत नाही. तो स्वीकारेपर्यंत चूक लक्षात आणून देत रहातो. आपण आपल्या सेवेत कधी चुकायला नको.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील अनेक गुणरत्नांचा खजिना असलेल्या सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) सनातनच्या ११८ व्या समष्टी संत घोषित !

सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या भावसोहळ्यात सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ही आनंदवार्ता घोषित केली.

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका पू. आजींकडे त्यांची सेवा करण्यासाठी जातात. त्यांना पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सासूबाई आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आई श्रीमती सुधा सिंगबाळ यांनी संतपद प्राप्त केलेल्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीमती सुधा सिंगबाळ यांनी व्यष्टी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण . . .

दीर्घकालीन रुग्णाईत असतांना मतदानाला जाऊन राष्ट्राप्रती कर्तव्य बजावणारे राष्ट्रप्रेमी संत पू. पद्माकर होनप (वय ७३ वर्षे) !

‘१४.२.२०२२ या दिवशी गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक होती. त्यात माझ्या वडिलांना (पू. पद्माकर होनप यांना) मतदान करायचे होते. त्यांचे पूर्वीचे निवडणूक ओळखपत्र नाशिक येथील होते.

साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणारे आणि साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देऊन साधनेत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्नरत असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘देवाला अपेक्षित असा आढावा देणे आणि घेणे होण्यासाठी काय करायला हवे ?’, हे मला सद्गुरु राजेंद्रदादांकडून शिकता आले.

त्याग आणि निरपेक्षता असलेल्या सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांच्या सन्मान सोहळ्यातील क्षणमोती !

जशी सूर्यनारायणाच्या आगमनाने फुले उमलती । तशी परात्पर गुरुदेवांच्या अस्तित्वाने संतपुष्पे फुलती । रथसप्तमीच्या दिनी येई गुरुतेजाची अनुभूती । पू. सुधा सिंगबाळ यांच्या रूपे सनातन संतमाला बहरली ।।

परेच्छेने आणि निरपेक्षभावाने जीवन जगून सर्वांसमोर त्यागाचा आदर्श ठेवणार्‍या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ११७ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) !

परेच्छेने आणि निरपेक्षभावाने जीवन जगून सर्वांसमोर त्यागाचा आदर्श ठेवणार्‍या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ११७ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) !