प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करणारे पू. भाऊकाका (पू. अनंत आठवले) आणि साधकांना परिपूर्ण घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
पू. अनंत आठवले

१. ‘रूपाली’ शब्दातील ‘रू’चा योग्य उकार लिहिण्यासंदर्भात विचारून घेणारे पू. अनंत आठवले !

‘ऑक्टोबर २०२१ मध्ये पू. भाऊकाकांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांना) मला देण्यासाठी एक ग्रंथ पाठवायचा होता. त्यासाठी त्यांना ग्रंथ ठेवलेल्या पाकिटावर माझे नाव लिहायचे होते. पू. भाऊकाकांनी त्यांच्याकडे सेवा करणार्‍या एका साधिकेला विचारले, ‘‘त्यांना (रूपालीला) विचारा, त्या ‘रूपाली’ या शब्दातील ‘रू’ दीर्घ लिहितात कि र्‍हस्व ?’’ त्या वेळी त्या साधिकेचा माझ्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा पू. भाऊकाकांनी स्वतः पाकिटावर माझे नाव ‘कु. रूपाली कुलकर्णी’ असे लिहिले. (‘रू’ हे अक्षर दीर्घ लिहिले.)

२. ‘दीप’ शब्दातील ‘दी’ दीर्घ लिहायला हवा’, असे सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले  !

कु. रूपाली कुलकर्णी

यावरून मला पूर्वीचा प्रसंग आठवला, ‘एकदा परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवलेल्या धारिकेत बालसाधकाच्या वडिलांचे नाव ‘दिप’ असे लिहिले होते. ते वाचून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘हे नाव चुकले आहे’’; पण मला ‘त्यात काय चुकले ?’, ते कळले नाही. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘दीप’ मधील ‘दी’ दीर्घ लिहायला हवा. आपला संदीप (ग्रंथ संकलनाची सेवा करणारे पू. संदीप आळशी) ‘दी’ दीर्घ लिहितो ना !’’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना परिपूर्णतेच्या मार्गावरून नेत असून त्यांच्यामुळेच ‘परिपूर्णता’ या शब्दाचा अर्थ कळणे

प्रत्येकच गोष्ट परिपूर्ण करणारे पू. भाऊकाका आणि साधकांना परिपूर्ण घडवणारे परात्पर गुरु डॉक्टर गुरुमाऊली यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहेत. ‘परात्पर गुरु डॉक्टर, केवळ आपल्यामुळेच आम्हाला ‘परिपूर्णता’ या शब्दाचा अर्थ कळत आहे आणि आपण आम्हाला परिपूर्णतेच्या मार्गावरून घेऊन जात आहात. या मार्गावर आपण आम्हा सर्व साधकांच्या समवेत आहात, हाच आमच्या मनुष्य जन्मातील खरा आनंद आहे.’ आम्हा सर्वांना आनंद देऊन आनंदी ठेवणार्‍या गुरुमाऊलीच्या चरणी सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०२१)