गोव्यात संचारबंदीत ३१ मे पर्यंत वाढ

संचारबंदीसाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्वीप्रमाणेच असतील. संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने चालू रहातील.

तौक्ते चक्रीवादळामुळे वीज खात्याची २५ कोटी रुपयांची हानी

वीज खात्याच्या अल्प दाबाच्या विद्युतवाहिनीचे जवळजवळ ७०० ते ८०० खांब मोडले आहेत, तर उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे १०० हून अधिक खांब मोडले आहेत. वीजपुरवठा करणारी ३० हून अधिक ट्रान्सफॉर्मर केंद्रे निकामी झाली, तर २०० ट्रान्सफॉर्मर केंद्रे नादुरुस्त झाली आहेत.

गोव्यात दिवसभरात ४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ३५८ नवीन रुग्ण

गोव्यात १८ मे या दिवशी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमधील २६, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आणि उर्वरित मृत्यू अन्य आरोग्य केंद्रात झाले. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र १९७ झाली आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोव्यात वीज खात्याची मोठ्या प्रमाणावर हानी

गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

खासगी डॉक्टर आणि कोविड सेंटर चालवणार्‍या स्पर्श हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांकडून १ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार !……गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत…

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लादलेले विविध निर्बंध

गोव्यात दिवसभरात दीड सहस्र नवीन रुग्ण, तर १७ रुग्णांचा मृत्यू

स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची ढासळलेली नैतिकता यांची कारणे आणि उपाय !

इंग्रजांच्या आक्रमणानंतर गुरुकुलपद्धत लोप पावली, स्वातंत्र्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नाही; त्याचा परिणाम म्हणजे सध्या समाजातील नैतिकता ढासळली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणावरील निष्ठा आणि कृती यांची आवश्यकता आहे.

डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी मडगाव येथे मुसलमानांकडून धरणे आंदोलन

‘अखिल गोवा अहले सुन्नत वज जमात’ या संघटनेचे कार्यकर्ते मडगाव येथील नगरपालिकेसमोर ‘महंत यति नरसिंहानंद यांना कह्यात घ्या’, ‘महंत यति नरसिंहानंद यांना फाशी द्या’, अशा आशयाचे फलक घेऊन रांगेत उभे होते.