
पणजी, ८ डिसेंबर (वार्ता.) १९ डिसेंबर २०२१ या दिवशी गोव्याच्या ६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याविषयी निश्चिती दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोव्यातील एकदिवसीय कार्यक्रमाचे स्वरूप अजूनही निश्चित झालेली नाही; मात्र त्यांच्या उपस्थितीविषयी निश्चिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असू शकतो. प्रारंभी पणजी येथील आझाद मैदानातील गोवा मुक्तीलढ्यातील हुतात्मा स्मारकाला आदरांजली वहाणे; नौसेना, वायूसेना आणि भूदल यांच्या वतीने मानवंदना स्वीकारणे; नौकांचे संचलन पहाणे आणि दुपारी ३.३० वाजता बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात आयोजित भव्य कार्यक्रमात सहभागी होणे.’’
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई