पुणे शहरात गणेशोत्सवात अनुचित घटना टाळण्यासाठी ७ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !

एका शहरात सहस्रो पोलिसांचा बंदोबस्त करावा लागणे आणि दहशतीखाली गणेशोत्सव साजरा करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !

श्री गणेशाची भक्ती करा !

श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूषित शक्ती आकर्षून घेणारा, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही.

Private Travels : गणेशोत्सवाच्या कालावधीत परळ आणि दादर येथे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट !

हिंदूंच्याच सणांच्या वेळी अशी लूट होण्यावर सरकार नियंत्रण आणणार का ?

उत्सवांना विधायक स्वरूप द्या…!

काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाणी कलाकार, अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ‘गणेशोत्सव बंद करावा’, असे विधान केले आणि त्यांच्या विधानावर जनतेतून असंख्य प्रतिक्रिया उमटल्या.

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत !

वर्ष २०२० मध्ये निपाणी नगरपालिकेने मूर्तीदान प्रकल्प राबवून जमा झालेल्या श्री गणेशाच्या मूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेऊन कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या. यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने निपाणी येथील भाविकांनी मूर्तीदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे बंद केले आहे.

गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळून धार्मिक गाणी उत्सवात लावूया !

गणेशोत्सव आपण सर्वांनी आनंदाने साजरा करूया, असे आवाहन भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. समाजिक  माध्यमांवर त्यांनी तशी एक चित्रफीत प्रसारित केली आहे.

धनकवडी (पुणे) येथे ११ गणेशोत्सव मंडळांची एकत्रित मिरवणूक !

एकत्रित मिरवणुकींमुळे व्ययाची (खर्चाची) बचत होते. संघटितपणा वाढतो. यंदाच्या मिरवणुकींमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे ढोल-ताशा पथक, आदिवासी परंपरेची झलक असलेला रथ असणार आहे.

श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजाविधी

पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व अधिक असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करू शकतो….

गणेशोत्सव मंडळांनी अनुमतीनुसार मंडप घातल्याची निश्चिती करण्याचे अतिक्रमण विभागाचे आदेश !

शहरातील गणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून परवाने देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केलेल्या मंडप धोरणानुसार गणेशोत्सव मंडळांना परवाने दिले आहेत. मंडळांकडून टाकण्यात येणारे मांडव धोरणांप्रमाणे आहेत कि नाही

मंडपात आणि जवळच्या ठिकाणी आवाजाचे निरीक्षण करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मंडळांना आदेश !

मंडपात २ ठिकाणी ‘डिजिटल डिस्प्ले बोर्डा’वर आवाजाची पातळी आणि मर्यादा नमूद असावी. तसेच त्यावर ध्वनीप्रदूषण आरोग्यासाठी हानीकारक असल्याची वैधानिक चेतावणी असावी.