धनकवडी (पुणे) येथे ११ गणेशोत्सव मंडळांची एकत्रित मिरवणूक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – धनकवडी येथील ११ गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित येऊन ७ सप्टेंबर (श्री गणेशचतुर्थीला) या दिवशी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच रथामध्ये ११ श्री गणेशमूर्ती ठेवण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्येक मंडळाच्या स्वतंत्र मिरवणुकींमुळे होणारी वाहने आणि कार्यकर्ते यांची गर्दी, ढोल-ताशांच्या आवाजाने होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यास साहाय्य होईल. या एकत्रित मिरवणुकीचे हे यंदाचे तिसरे वर्ष आहे, अशी माहिती ‘आदर्श मित्र मंडळा’चे उदय जगताप यांनी दिली.

एकत्रित मिरवणुकींमुळे व्ययाची (खर्चाची) बचत होते. संघटितपणा वाढतो. यंदाच्या मिरवणुकींमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे ढोल-ताशा पथक, आदिवासी परंपरेची झलक असलेला रथ असणार आहे.