७०० रुपयांऐवजी १ सहस्र २०० रुपये आकारले !
मुंबई – सध्या श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून गावाला जाण्यासाठी अवाच्या सवा भाडे आकारत असल्याचे उघड झाले आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने यासंदर्भात परळ आणि दादर येथील खासगी ट्रॅव्हल्सच्या दुकानात जाऊन चौकशी केली. त्यानंतर ही लूट केली जात असल्याचे समोर आले.
तिकिटांची नोंदणी करणार्या चालकांनी प्रत्येक ठिकाणचे दर वेगवेगळे सांगितले. मुंबई-राजापूर या प्रवासासाठी १ सहस्र २०० रुपये, तर चिपळूणसाठी १ सहस्र ३०० रुपये भाडे आकारले जात आहे. वातानुकूलित गाड्यांचा दर २ सहस्र १०० रुपये, तर विना वातानुकूलित गाड्यांचा दर १ सहस्र ८०० रुपये इतका आहे. एरव्ही हे दर केवळ ७०० ते ८०० रुपये इतकेच असतात. अशा प्रकारे प्रवाशांकडून दुप्पट दर आकारला जात आहे. याविषयी तिकीट नोंदणी करणार्यांना विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘गणेशोत्सवाचे हे २- ३ दिवसच आम्हाला मिळतात की, ज्यात असे पैसे कमावता येतात.’’
संपादकीय भूमिकाहिंदूंच्याच सणांच्या वेळी अशी लूट होण्यावर सरकार नियंत्रण आणणार का ? |