|
कवर्धा (छत्तीसगड) – प्रयागराज येथील महाकुंभपर्वात अहिंदूंना प्रवेश देऊ नये, अशी मागणी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली. यासह त्यांनी महाकुंभपर्वात अहिंदूंना दुकाने थाटण्याची अनुमती न देण्याच्या सूत्राचेही समर्थन केले.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की,
१. ज्यांना सनातन संस्कृती, पूजाविधी आणि साहित्याची शुद्धता, यांविषयी माहिती असेल, अशा हिंदूंनाच दुकाने थाटण्याची अनुमती दिली जावी. ज्यांना याविषयी माहिती नाही, त्यांना प्रवेश देऊ नये. कुठे थुंकल्याची घटना घडली, तर कुठे फळांवर घाण लावतांना दिसले, असे होऊ शकते. यामागे काही कटकारस्थान असू शकते, असे आम्ही म्हणत नाही.
📢 Ban the entry of Non-Hindus, and also do not let them set up shops at Prayagraj Mahakumbh – Pandit Dhirendra krishna Shastri of Bageshwar Dham
👉 It is frequently observed that non-Hindus come to #Mahakumbh Parv either to earn money, or to convert #Hindus. Therefore, if… pic.twitter.com/RRlDRjvsUQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 4, 2024
२. प्रयागराज येथे त्रिवेणी संगम आहे. येथे संतांचे दर्शन होते. धार्मिक कथेशी तुमचा काही संबंध नाही. तुमचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. तुमचा सनातनशी काहीही संबंध नाही. तुमचा श्रीरामाशी काही संबंध नाही. जर तुम्हाला श्रीरामाशी काही देणेघेणे नसेल, तर तुम्हाला श्रीरामाच्या कामाचा काय उपयोग ?
संपादकीय भूमिका
|