गंगाजल पिण्यास सांगितल्यावर दिला नकार !
(गंगा-जमनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती)
गाझीपूर (उत्तरप्रदेश) : येथील कासीमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक लोकांनी भगवे कपडे परिधान करून साधूच्या वेषात भीक मागणार्या ३ मुसलमानांना पकडले. तिघांनाही पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. सोहराब, शहजाद खान आणि नियाज अशी त्यांची नावे आहेत. तिघेही शेजारील मऊ जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
स्थानिक लोकांनी त्यांना याविषयी विचारले असता या मुसलमानांनी सांगितले की, ‘हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. त्यांचे वडील आणि आजोबाही तेच करत आले आहेत.’ या तिघांनीही स्वत:ला गोरखनाथ मंदिराशी संबंधित योगी असल्याचे सांगितले.
स्थानिक हिंदूंनी या लोकांना गंगाजल प्यायला सांगितले; मात्र तिघांनीही गंगाजल पिण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती देऊन तिघांनाही त्यांच्या ताब्यात दिले.
संपादकीय भूमिका
|