Missionaries Use Saffron Flag : छत्तीसगडमध्ये वाहनांवर भगवा ध्वज लावून केला जात आहे ख्रिस्ती धर्माचा प्रचार

हिंदू संघटनांकडून होत आहे विरोध

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील पाथरी गावात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणार्‍या वाहनांवर भगवे झेंडे लावून लोकांची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक हिंदु तरुणांनी त्याला विरोध केला.

रिक्शावर भगवा ध्वज लावून पत्रके वाटण्यात येत होती. तसेच लोकांच्या घरी येशूशी संबंधित साहित्य वाटण्यात आले. ते समोर येताच स्थानिक तरुण आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सक्रीय झाले. त्यांनी मिशनर्‍यांना जोरदार विरोध केला. त्यानंतर मिशनरी पळून गेले. या प्रकरणी राष्ट्रीय बजरंग दलाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 छत्तीसगडचे भाजप सरकार आणणार धर्मांतरविरोधी कायदा !

छत्तीसगडचे भाजप सरकार कायदा आणून बलपूर्वक, आमीष दाखवून किंवा फसवणूक करून धर्मांतर करणार्‍यांना कठोर शिक्षेची तरतूद करणार आहे. (एकेका राज्याने असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी या संदर्भात कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक) या कायद्यानुसार धर्मांतराची तक्रार प्रथम जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे करणे आवश्यक असेल. अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेनुसार दोषींना शिक्षा होईल.

संपादकीय भूमिका

गेली अनेक दशके ख्रिस्ती मिशनरी उघडपणे हिंदूंचे धर्मांतर करत असतांना ते अजूनही हिंदूंना रोखता न येणे हिंदूंसाठी लज्जास्पदच आहे !