सुरत (गुजरात) – येथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असून यात भगवे कपडे परिधान केलेल्या साधूच्या वेशात ३ जण भीक मागतांना दिसत आहेत. काही लोक या तिघांशी वाद घालत आहेत. हे सर्व जण साधू नसून मुसलमान असल्याचा आरोप हे लोक करत आहेत. या तिघांना हिंदूंच्या देवतांची नावे नीट सांगता आली नाही, तसेच कोणत्याही धर्मग्रंथातील श्लोक म्हणता आला नाही.
व्हिडिओ बनवणार्या व्यक्तीने जेव्हा या लोकांना श्लोक म्हणण्यास सांगितले, तेव्हा ते उर्दूमध्ये ‘दुआ’ (कृपा) असे बोलू लागले. त्यांना केवळ भोलेनाथाचे नाव ठाऊक होते. यातील एकाचे ओळखपत्र तपासले असता त्यात त्याचे नाव सलमान असे लिहिलेले आढळले.
काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील गाझीपूरमध्ये भगवी वस्त्रे परिधान करून साधूंच्या वेशात फिरणार्या ३ मुसलमानांना पोलिसांनी अटक केली होती.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांना चरितार्थ चालवण्यासाठी आता हिंदु बनावे लागते, भगवी वस्त्रे परिधान करावी लागतात, यातून त्यांचा धर्म भ्रष्ट होत नाही का ? |