कोल्हापूर, ३ डिसेंबर (वार्ता.) – भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगांना (अपंगांना) अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय, हात आणि ‘कॅलिपर’ विनामूल्य बसवण्यासाठी १६ डिसेंबर या दिवशी पुणे येथे राज्यस्तरीय दिव्यांग शिबिर पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबिर खराडी येथील ढोले-पाटील कॉलेज, ‘इऑन आय.टी.पार्क’जवळ पार पडेल. या शिबिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित रहाणार आहेत. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘भारत विकास परिषदे’च्या वतीने विश्
श्री. विनय खटावकर पुढे म्हणाले, ‘‘भारत विकास परिषद ही सेवा आणि संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवणे, हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे. भारतातील १३ विकलांग केंद्रांपैकी पुण्यात एक केंद्र कार्यरत असून कायमस्वरूपी असलेले हे केंद्र गेल्या २५ वर्षांपासून अखंड कार्यरत आहे. कोणत्याही सरकारी साहाय्याविना प्रत्येक वर्षी ५ सहस्र दिव्यांगांना याचा लाभ होत आहे. गेल्या ५ वर्षांपासून परंपरागत ‘जयपूर फूट’ऐवजी ५० सहस्र रुपयांचा अत्याधुनिक कृत्रिम ‘मॉड्युलर’ पाय आणि हात, ‘पोलिओ कॅलिपर’ विनामूल्य बसवण्यात येतात. पुण्यातील या शिबिरात १ सहस्र दिव्यांगांचे उद्दिष्ट आहे. लाभार्थींना कोणतेही आर्थिक निकष नसून राज्यातील सर्व होतकरू दिव्यांग यात सहभागी होऊ शकतात. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी ९१७५५५८३५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.’’