(टीप : ‘सायबर गुन्हा’ म्हणजे संगणक आणि इंटरनेट यांचा वापर करून केला जाणारा गुन्हा !)
‘प्रतिदिन आणि प्रत्येक ठिकाणी सायबर गुन्ह्यांच्या संख्येत होणारी भौमितिक वाढ ही केवळ चिंताजनकच नाही, तर वेदनादायीही आहे. श्रीमंत किंवा गरीब, सुशिक्षित किंवा अशिक्षित, पुरुष आणि स्त्रिया, वृद्ध, तसेच तरुण असो जवळजवळ प्रत्येक जण यामध्ये फसत आहे. याला कुणीही अपवाद नाही. गुन्हेगार सहसा अदृश्य असतात आणि दिसल्यास त्यांची ओळख बनावट असते. फसलेले लोक भोळे, संशय न बाळगणारे असतात. ते सहजपणे डावपेचांना फसतात. हे पीडित लोक बहुतेक वेळा लाज किंवा भीती वा जागरूकतेच्या अभावामुळे या गुन्ह्यांची तक्रार करत नाहीत. जेव्हा त्यांची फसवणूक झाली आहे, हे त्यांना कळते, तेव्हा बराच काळ निघून गेलेला असतो आणि तोपर्यंत व्यवहार पूर्ण होऊन हस्तांतरित केलेली रक्कम गुन्हेगारांनी काढून घेतलेली असते.
२९ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पीडितांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून विशिष्ट तंत्राचा वापर, पीडित व्यक्तीची विविध प्रकारे खासगी माहिती मिळवण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न आणि सायबर गुन्ह्यांच्या सतर्कतेविषयी भारतीय बँकांकडून ग्राहकांना सूचना’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/849072.html
६. संकेतस्थळावर असलेल्या सायबर गुन्ह्यांच्या श्रेणी
अ. ‘क्रिप्टो करन्सी’ (आभासी चलन) गुन्हे
आ. सायबर जिहाद
इ. संगणक यंत्रणा हॅक करणे किंवा बिघडवणे
ई. ऑनलाईन आणि सामाजिक माध्यमांशी संबंधित गुन्हे
ई १. तोतयागिरी करून फसवणे
ई २. सायबर बुलींग (गुंडगिरी), ‘स्टॉकींग’ (धमकी देणे) किंवा सेक्टींग (अश्लील चित्रे पाठवणे)
ई ३. आपल्या बँकेच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डचे ‘पासवर्ड’ (संकेतांक) किंवा आय.डी. जाणून घेण्यासाठी आपल्याला संगणकीय पत्र अथवा संदेश पाठवणे.
उ. बनावट संगणकीय पत्ता (इ-मेल)
ऊ. संगणकीय पत्राद्वारे धमकावणे
ए. ऑनलाईन नोकरीची फसवणूक
ऐ. ऑनलाईन वैवाहिक फसवणुकीची घटना
ओ. ‘प्रोफाईल हॅकिंग’ (ओळख चोरणे)
औ. बेकायदेशीर कृत्यांसाठी चिथावणीखोर भाषण
७. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले ‘सायबर गुन्हे अन्वेषण क्षमता केंद्र’ !
सायबर गुन्ह्यांशी लढा देण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने अलीकडेच ‘सायबर गुन्हे अन्वेषण क्षमता केंद्रा’ची स्थापना केली आहे. ‘क्रिप्टो करन्सी’च्या फसवणुकीसारख्या गुन्ह्यांच्या अन्वेषणामध्ये साहाय्य करण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ‘तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धीमत्ता’ (टेक्निकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अन् यंत्र शिक्षण साधनांसह सर्वोत्तम जागतिक तंत्रज्ञान असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा उल्लंघनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि व्यक्ती अन् व्यवसाय यांना लक्ष्य करणारे धोके यांना प्रतिसाद देण्यासाठी सिद्ध केलेले ‘सुरक्षा ऑपरेशन केंद्र’ (सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर) आहे. त्यांनी २४ घंटे कार्यरत असलेल्या कमांड सेंटरमध्ये ‘हेल्पलाईन’ क्र. १४४०७ ही चालू केली आहे. सायबर घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी समन्वय साधण्यासाठी त्यांच्याकडे ‘संगणकीय आपत्कालीन प्रतिसाद पथक’ (कॉम्प्युटर इमर्जन्सी रिसपॉन्स टीम) आहे.
८. फसवणूक टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय
संगणक, भ्रमणभाष किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या रूपात ‘सायबर स्पेस’चा वापर करणार्या प्रत्येकाने भारतातील किंवा परदेशातील अज्ञात भ्रमणभाष क्रमांकावरून किंवा संगणकीय पत्त्यावरून (‘इ-मेल’वरून) अथवा ‘व्हिडिओ कॉल’वरून येणार्या कोणत्याही संपर्कांना प्रतिसाद देणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करून मी या लेखाचा समारोप करीन. जर तुम्हाला प्रतिसाद द्यायचा असेल, तर प्रथम त्या व्यक्तीचे तपशील, संपर्क किंवा संगणकीय पत्र पडताळून पहा. सतत जागरूक रहाण्यानेच तुमचे जीवन, पैसा आणि प्रतिष्ठा यांचे वाढत्या सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण होऊ शकते.
मी भारत सरकारला विनंती करीन, ‘२४ घंटे उपलब्ध असलेली ही ‘पोर्टल्स’ (संकेतस्थळे) आणि ‘हेल्पलाईन’ ही वापरकर्त्यांसाठी अनुकूल बनवावीत, जेणेकरून प्रत्येक जण त्यांचे अनुकरण करू शकेल. ऑनलाईन कंपन्या, अधिकोष, गुंतवणूक केंद्र यांच्याद्वारे सामायिक केल्या जाणार्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितताही सरकारने सुनिश्चित केली पाहिजे. फसवणूक करणारे ही माहिती सहजपणे मिळवू शकतात. खरे तर हे रोखण्यासाठी सरकारने कायदेशीर कायदा केला पाहिजे आणि ही माहिती इतरांना देणार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.’ इतर प्रगत देशांमधील सायबर गुन्हेगारांना, ते कुठून काम करत असतील ते अचूकपणे शोधण्यात आणि पकडण्यात सक्षम अशा नवीन तांत्रिक नवकल्पनांचा अभ्यास करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. या सीमाहीन सायबर गुन्हेगारांपासून भारतियांना वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि इतर देशांच्या सरकारांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न वाढवण्याची आवश्यकता आहे.’ (समाप्त)
– श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, मुंबई. (२३.१०.२०२४)
सायबर गुन्ह्यांविषयी नोंद करण्यास साहाय्य करणारी संकेतस्थळेअ. भारत सरकारने १९३० क्रमांकाची ‘हेल्पलाईन’ चालू केली असून ‘सायबर क्राईम’ला फसलेल्यांनी https://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करावा. आ. दूरसंचार खात्याचे ‘चक्षु’ नावाने ‘पोर्टल’ आहे. यावर संशयित घोटाळा आणि गेल्या ३० दिवसांत आलेले अनाहूत व्यावसायिक संवाद यांची माहिती देता येईल. https://services.india.gov.in/service/detail/chakshu-report-suspected-fraud-communication हे पोर्टल अनेक तर्हेने तुम्हाला साहाय्य करते. यामध्ये तुम्हाला इंटरनेट सेवा देणारे आस्थापन कोणते आहे, ते कळण्यासाठी (https://services.india.gov.in/service/service_url_redirect?id=MjQ0MTA=) या लिंकचा उपयोग करता येईल. तुम्हाला आलेला भारतीय क्रमांक असलेला आंतरराष्ट्रीय कॉलच्या माहितीसाठी (https://services.india.gov.in/service/service_url_redirect?id=MjQ0MDg=) ही लिंक उपयुक्त आहे. तुमच्या नावाने दिलेल्या जोडण्यांची संख्या जाणून घेण्यासाठी (https://services.india.gov.in/service/service_url_redirect?id=MjQwNTA=) या लिंकचा उपयोग करता येईल. तुमचा आय.एम्.ई.आय. क्रमांक वापरून भ्रमणभाष पडताळून पहाण्यासाठी (https://services.india.gov.in/service/service_url_redirect?id=MjQwNDg=) या लिंकचा उपयोग करता येईल. – श्री. प्रवीण दीक्षित भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रसायबर गुन्ह्यांना सर्वसमावेशक पद्धतीने हाताळण्यासाठी कायदा कार्यवाहीत आणणार्या संस्थांना एक दिशा प्रदान करण्यासाठी गृह मंत्रालयाने नवी देहलीत ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रा’ची (आय4सी) स्थापना केली. देशातील सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नोडल पॉईंट’ (केंद्रबिंदू) म्हणून काम करण्यासाठी या केंद्राची कल्पना आहे. (https://i4c.mha.gov.in/ ) हे केंद्र सायबर योद़्ध्याच्या स्वरूपात कायद्याची कार्यवाही करणार्या संस्थांना प्रशिक्षण देऊन जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांशी संबंधित आहे. या केंद्राने सायबर गुन्ह्यांविषयी सहस्रो पोलीस अधिकार्यांना प्रशिक्षण दिले आहे. हे सायबर मित्राच्या स्वरूपात सामाजिक माध्यमांद्वारे जागरूकता संदेशही पसरवते. त्यानुसार सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या सुरक्षित पद्धतींमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत. १. संगणकावर येणार्या विविध सूचना (पॉप अप), अज्ञात मेल आणि दुवे टाळणे (https://i4c.mha.gov.in/#:ॱ:text=Avoid%20pop%2Dups%2C%20unknown%20emails%20and%20links) २. सुरक्षित संकेतांक आणि प्रमाणीकरण वापरा (https://i4c.mha.gov.in/#:ॱ:text=Use%20strong%20password%20protection%20and%20authentication) ३. तुमच्या माहितीसाठी अद्ययावत् प्रणाली आणि बॅकअप स्थापित करा ! (https://i4c.mha.gov.in/#:ॱ:text=Install%20updates%20and%20back%20up%20your%20files) – श्री. प्रवीण दीक्षित |