भारतात मुसलमान नाही, तर हिंदूच असुरक्षित !

कोटा (राजस्थान) येथे काही दिवसांपूर्वी मंदिरात जातांना संघाचे ६५ वर्षीय स्वयंसेवक सत्यनारायण गुर्जर यांचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणातून हा मृत्यू धर्मांध मुसलमानांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचे आता उघड झाले.

कर्नाटक बनत आहे दुसरे पाकिस्तान ?

बिदर (कर्नाटक) येथील गुरुनानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयात नाटकाचा सराव चालू होता. या वेळी काही हिंदु विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिल्याने धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. यात २ विद्यार्थी घायाळ झाले.

आम आदमी पक्षाच्या सरकारची हुकूमशाही !

पंजाबमध्ये ‘झी’ प्रसारमाध्यमाच्या सर्व वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या वाहिनीनेच ही माहिती दिली आहे. वाहिनीकडून सांगण्यात आले की, ‘हे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील आक्रमण आहे.’ पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे.

‘मुसलमान असुरक्षित आहेत’ म्हणणारे आता कुठे आहेत ?

भरुच (गुजरात) येथे अल्ताफ हुसेन शेख नावाच्या मुसलमान तरुणाने रस्त्यावरून चालत जाणार्‍या ६ जैन साध्वींवर आक्रमण केले. आक्रमण करण्यापूर्वी आरोपी तरुण बराच वेळ जैन साध्वींचा पाठलाग करत होता.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

कोसीकला (उत्तरप्रदेश) येथील पंजाबी मार्केटमधील वाहिद कुरेशी नावाच्या दुकानदाराने प्लास्टिकच्या पिशवीवर ‘पंजाबी मार्केट’ऐवजी ‘इस्लामिक मार्केट’ असे छापले. पोलिसांनी वाहिद कुरेशी याला अटक केली.

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

तेलंगाणातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांचा पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो काढून टाकला. हिंदूंनी पोलिसांकडे तक्रार केली असून त्यात महंमद, माबुसाब, इमाम, रंजू आणि नवाब यांच्यावर आरोप केले आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटणारे आता कुठे आहेत ?

हिंदी चित्रपट ‘हमारे बारह’चे निर्माते आणि कलाकार यांना ठार मारण्याच्या, तसेच बलात्कार करण्याच्या धमक्या मिळाल्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. हा चित्रपट इस्लामी परंपरांवर भाष्य करणारा असल्याने या धमक्या मिळाल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांवर आक्रमण करणारे मुसलमान देशात असुरक्षित कसे ?

लुटलेला माल परत मिळवण्यासाठी मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील पाकबाडा भागात गेलेल्या तमिळनाडू पोलिसांवर गुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांनी आक्रमण केले. यात २ पोलीस उपनिरीक्षक घायाळ झाले.

देशात मुसलमान असुरक्षित नाहीत !

मधुबनी (बिहार) येथे २० मे या दिवशी बनावट मतदान करतांना सनाउल्ला या पुरुषासह सादिया, फातिमा आणि झीनत या महिलांना पकडल्यानंतर १५० हून अधिक मुसलमानांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून या चौघांची सुटका केली.

न्यायालयाचा अवमान करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई व्हावी !

कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमध्ये वर्ष २०१० पासून देण्यात आलेली सर्व ओबीसी (इतर मागावर्गीय) प्रमाणपत्रे बेकायदा ठरवली आहेत. ‘उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणार नाही’, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.