भारत सरकार अशा घटनांवर कधी बोलणार ?

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या श्रीराममंदिरावर रात्रीच्या वेळी आक्रमण करून त्याची तोडफोड करण्यात आली. मंदिरांतील मूर्तीही फोडण्यात आल्या. काही मूर्ती आणि श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली.

हिंदु राजकारणी असे का बोलत नाहीत ?

जम्मू येथे हिंदूंवरील आतंकवादी आक्रमणानंतर ‘पाकिस्तानी आतंकवाद्यांना काश्मीर खोर्‍यात हिंदूंची हत्या करू देऊ नका. त्यांचे रक्षण करा !’, असे आवाहन नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.

गांधीवादी काँग्रेसची हिंसा जाणा !

केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश गोपी हे विजयी झाले आहेत. येथे काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ७ जून या दिवशी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये लाठ्या-काठ्यांद्वारे हाणामारी झाली.

देशात मुसलमान नव्हे, तर हिंदू असुरक्षित !

बिहारमधील कौहा गावामध्ये वटसावित्री पूजेचे व्रत करण्यासाठी येथील ईदगाह जवळ असलेल्या वटवृक्षाखाली पूजा करण्यासाठी गेलेल्या हिंदु महिला आणि पुरुष यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण केले. यात १२ जण घायाळ झाले.

काँग्रेसची इस्लामी राजवट जाणा !

मुसलमान महिलांची अवस्था दाखवणार्‍या ‘हमारे बारह’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. विविध मुसलमान संघटनांच्या तक्रारी आल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हे पोलिसांना लज्जास्पद !

राजधानी देहलीतील तिहार कारागृहात २ टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. गेल्या वर्षी मे महिन्यात याच कारागृहात गुंड ताजपुरिया याची प्रतिस्पर्धी टोळीतील अनेकांनी भोसकून हत्या केली होती.

हिंदूंनो, कुणाला नोकरी द्यायची, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी येथील एका हिंदु दुकान मालकाच्या मुलीवर दुकानातील दानिश खान या कामगाराने बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे वापरून तिच्याकडून पैसे उकळले. खान याला अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण देशात अशी कारवाई का होत नाही ?

ध्वनीप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) हटवण्यात आले आहेत.

‘बॉलिवूड’चे कलाकार आता गप्प का ?

मुंबईत अभिनेत्री रविना टंडन यांच्यावर मुसलमानांनी ‘वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घातली, तसेच तिला मारहाण केली’, असा खोटा आरोप करत त्यांच्यावर आक्रमण केले.

कर्नाटकातील काँग्रेसची ‘पाकिस्तानी राजवट’ जाणा !

मंगळुरू (कर्नाटक) येथील कंकनाडी मशिदीसमोरील रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांवर गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.