गोव्यात येणार्‍या प्रवाशांना कोरोनाबाधित नसल्याचा दाखला आणणे बंधनकारक करता येणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात आर्थिक घडामोडी पुन्हा बंद करता येणार नाहीत. कोरोनासंबंधी चाचण्यांमध्ये वाढ करता येईल – डॉ. प्रमोद सावंत

राज्यातील गुंडांना ६ मासांत तडीपार करू ! – मुख्यमंत्री

कुख्यात गुंड अन्वर शेख याच्यावर १६ फेब्रुवारीला गुंडांच्या अन्य एका टोळीने आक्रमण केल्यानंतरचे त्यांचे हे वक्तव्य आहे.

वर्ष २०२१ च्या गोव्याच्या अर्थसंकल्पात शासन कर किंवा शुल्क यांमध्ये कपात करण्याच्या विचारात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पाला अनुसरून ‘सी.आर्.ई.डी.ए.आय.’, ‘जी.एस्.ए.’ आणि लहान हॉटेल व्यावसायिक यांच्यासमवेत ११ फेब्रुवारी या दिवशी बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत. गोवा राज्य गेली अनेक मास हे भोगत आहे, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे, असे अनेक घटकांचे मत ! – शासन नियुक्त भास्कर नायक समितीचा अहवाल

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे शासनाने लक्षात घेऊन त्वरित प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच देण्यास प्रारंभ करावे !

२ वर्षांत राज्यातील २३ मराठी प्राथमिक शाळा बंद

राज्यात मागील २ वर्षांत २३ मराठी प्राथमिक शाळा बंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना दिली. विधानसभेत उपस्थित प्रश्‍नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

स्वयंपूर्ण आणि भांगराळे (सोनेरी) गोवा यांसाठी सरकार कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक विनायक खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक आणि साहित्यिक श्री. विनायक विष्णु खेडेकर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मडगाव येथील स्वामी विवेकानंद केंद्र खुले करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गोवा भेटीच्या वेळी भेट दिलेल्या मडगाव येथील ‘दामोदर साल’ या ठिकाणाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

जनभावनांचा आदर करून मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला एका गटाचा विरोध होता आणि हा गट इतरांची दिशाभूल करत होता. आयआयटी प्रकल्पाचे लाभ सांगूनही लोकांना ते पटले नसल्याने शासनाला आता तेथील प्रकल्प रहित करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.