गोवा शासन महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पिंक फिमेल फोर्स’ सिद्ध करण्याच्या विचारात !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण शिकवण्यासमवेत समाजाला धर्मशिक्षण दिल्यास समाजात नीतीमत्ता निर्माण होऊन महिलांवरील आक्रमणे थांबतील ! – संपादक

पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.)  महिलांच्या सुरक्षेसाठी शासन राज्यात ‘पिंक फिमेल फोर्स’ सिद्ध करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘पिंक फिमेल फोर्स’ असणे आवश्यक आहे. हा गट कशा पद्धतीने सिद्ध करता येईल, याचा विचार केला जात आहे. राज्याच्या गृह खात्याने महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना कार्यान्वित केल्या आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात गुन्हेगारांना शोधून काढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिलांच्या विरोधातील गुन्हे घटवण्यासाठी आता लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.’’

गोवा वेल्हा येथे ८ नोव्हेंबर या दिवशी उपाहारगृहात न्याहारी करतांना एका महिलेवर उपाहारगृहातील पुरुषाने आक्रमण केले. बिठ्ठोण येथे एका धर्मांधाने बलात्कार केलेल्या अल्पवयीन मुलीने ६ नोव्हेंबर या दिवशी तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रत्यन केला. अशा स्वरूपाच्या महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना हल्लीच्या काळात गोव्यात घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.