सातारा येथे अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट !

भाजप युवा मोर्चाच्या वतीने हा कडेलोट करण्यात आला, तसेच अजित पवार यांनी समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या असून क्षमा मागावी, अन्यथा सातारा शहरामध्ये त्यांना फिरू न देण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.

अजित पवार यांच्या विरोधात गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे निदर्शने !

विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे कधीच धर्मवीर नसल्याचे वक्तव्य केले.

राजकारणासाठी इतिहास पालटू शकत नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांना देण्यात आलेली ‘धर्मवीर’ उपाधी ही काही आता देण्यात आलेली नाही. शेकडो वर्षांपासून त्यांना ही उपाधी आहे. धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर निर्घृण अत्याचार करण्यात आले; परंतु त्यांनी धर्म सोडला नाही.

(म्हणे) ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान ! लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांचा उपहासगर्भ अभिप्राय ! हिंदुत्वनिष्ठ संतप्त.

स्वराज्य आणि स्वधर्म यांसाठी बलीदान केलेल्या हिंदु छाव्याचे धर्मवीर पद नाकारणे, हा हिंदूंचा अपमान ! – हिंदु महासभा

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा भाजप महिला मोर्चाच्या वतीने निषेध !

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नव्हते, असे म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सांगली भाजप महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर २ जानेवारीला निषेध आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार यांना ‘धर्मवीर’ कधीच कळणार नाहीत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केले. संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले; पण त्यांनी मान्य केले नाही. औरंगजेबाने त्यांना का मारले ? स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म यांसाठी त्यांनी हालअपेष्टा सहन करून बलीदान स्वीकारले.

इस्लामी राष्ट्रवादी नेत्यांना ओळखा !

काही जण छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केले.

कुणी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अजित पवार आणि त्यांच्या विचारांचे लोक यांनी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच; पण ते धर्मवीरही होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.