नागपूर – छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केले. संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले; पण त्यांनी मान्य केले नाही. औरंगजेबाने त्यांना का मारले ? स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म यांसाठी त्यांनी हालअपेष्टा सहन करून बलीदान स्वीकारले. शरिराचे अक्षरशः तुकडे केले, तरी त्यांनी स्वधर्म सोडला नाही. अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक, तर होतेच; पण ते धर्मवीरही होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते; मात्र त्यांना जाणीवपूर्वक ‘धर्मवीर’ म्हटले जात आहे, असे वक्तव्य विधानसभेत केले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.