राजकारणासाठी इतिहास पालटू शकत नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, ३ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांना देण्यात आलेली ‘धर्मवीर’ उपाधी ही काही आता देण्यात आलेली नाही. शेकडो वर्षांपासून त्यांना ही उपाधी आहे. धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर निर्घृण अत्याचार करण्यात आले; परंतु त्यांनी धर्म सोडला नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ आहेत. राजकारणासाठी इतिहास पालटू शकत नाही, असे विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर व्यक्त केले.

या वेळी दीपक केसरकर म्हणाले, ‘‘मोगलांनी केलेले अत्याचार हे ऐतिहासिक सत्य आहे, हे सत्य पालटू शकत नाही. छत्रपती संभाजी राजांना ‘धर्मवीर’ शेकडो वर्षांपासून म्हटले जात आहे. राजकारण मात्र आता चालू आहे.’’

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणाविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी ‘आव्हाड हे मूळ असे नाहीत. त्यांच्याकडून हे कोण वदवून घेत आहे, हे पहायला हवे’, असे वक्तव्य केले.