सकाळचा पहिला आहार पोटातील ‘मार्ग’ मोकळा असतांनाच घ्यावा !
सकाळी शौचाला, तसेच लघवीला साफ होणे, खालून (गुदद्वारातून) वात सरणे, ढेकर आल्यास त्याला अन्नाचा वास नसणे, शरीर हलके असणे, घसा स्वच्छ असणे आणि सडकून भूक लागणे, ही पोटातील ‘मार्ग’ मोकळा असल्याची लक्षणे आहेत.