‘अनेकांकडून गांभीर्याने दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली जाते, तेवढी हिरड्या, जीभ आणि घसा यांच्याविषयी न घेता त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.
दंतधावन झाल्यावर हिरड्यांना ‘मसाज’ करणे आवश्यक असते. त्यासाठी दंतमंजन घेऊन हिरड्यांवर हलक्या हाताने चोळावे, जेणेकरून त्यांवरील चिकटा निघेल. हिरड्या मजबूत असणे, हे दातांच्या बळकटी आणि आरोग्यासाठी आवश्यक असते.
त्यासह जीभेवरील कफही बोटांनी किंवा ‘टूथब्रश’च्या मागील बाजूने स्वच्छ करावा. हे करतांना घशातील कफ बाहेर आला, तर तो काढून टाकल्यास लाभदायक ठरतो. याने अप्रत्यक्षरित्या घशाची स्वच्छताच होते.
अशा प्रकारे हिरड्या, जीभ आणि घसा नियमित स्वच्छ केल्यास दातांसह एकूणच मुखाचे आरोग्य निश्चितच राखले जाऊन हितावह ठरेल !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२६.१२.२०२२)
संपर्कासाठी ई-मेल – [email protected] |