तापातून लवकर बरे होण्यासाठी खाण्याजोगे पदार्थ !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६०

रुग्णाचा ताप तपासतांना
वैद्य मेघराज पराडकर

‘ताप आलेला असतांना शरिराची सर्व यंत्रणा तापातून बरे होण्याचा प्रयत्न करत असते. अशा वेळी दूध, दही, पोळी, सुकामेवा, फळे यांसारखे पचायला जड पदार्थ खाऊ नयेत. तापातून लवकर बरे होण्यासाठी मुगाचे कढण (मूगडाळ शिजवून त्यात चवीपुरते मीठ आणि गूळ घालून केलेला पदार्थ), मूगडाळीचे वरण, वरणभात, पातळभात, मूगडाळ घालून केलेली तांदळाची खिचडी, रव्याचा उपमा, दूध न घालता बनवलेला शिरा, तांदळाच्या पिठाचे न आंबवता केलेले घावन, राजगिरा लाडू, भाजलेले पोहे किंवा लाह्या यांसारखे पचायला हलके पदार्थ खावेत. चवीपुरते लिंबाचे लोणचे घेतल्यास चालते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)

या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या.